आता अमेरिकेहून मागवा 'ऑडी'; तेही स्वस्तात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 31, 2019

आता अमेरिकेहून मागवा 'ऑडी'; तेही स्वस्तात

https://ift.tt/2SGIp3g
नवी दिल्लीः नवीन वर्ष कार खरेदी करणाऱ्यांसाठी जबरदस्त असणार आहे. नवीन वर्षात यूरोपहून भारतात गाड्यावरील स्वस्त होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार लवकरच यूरोपमध्ये बनवण्यात येणाऱ्या कारवरील आणि मद्यावरील आयात शुल्क कमी करण्याच्या विचारात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे यूरोपमधून कार मागवणं स्वस्त होणार आहे. यूरोपमधील उत्पादनासंदर्भात यूरोपियन आणि भारत सरकार यांच्यात अनेक वर्षापासून चर्चा सुरू आहे. आयात शुल्क कमी करण्यासाठी भारत सरकारची तयारी नव्हती. परंतु, आता केंद्र सरकार राजी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. जर्मनी आणि अन्य यूरोपियन देशातून आयात केल्या जाणाऱ्या गाड्यावर २०० टक्के शुल्क भरावा लागतो. त्यामुळे एका ऑडी गाडीची किंमत १५ लाख रुपये असली तरी ती भारतात आल्यास ३० लाखाची होती. तसेच त्यावर २८ टक्के जीएसटी लावला जातो. सेस आणि रोड टॅक्स लावल्यानंतर त्या गाडीची किंमत ४० ते ४५ लाख रुपये होते. ही सर्व किंमत कंपनी ग्राहकांकडून वसूल करते. यूरोपमध्ये बीएमडब्ल्यू, फॉक्सवॅगन, लेक्सस, पियाजिओ यासारख्या गाड्या बनतात. अमेरिकेत ऑडी क्यू८ ची किमत ६८२०० डॉलर म्हणजेच ४८ लाख ६८ हजार ७८० रुपये आहे. तर भारतात याच गाडीची किंमत १.४० कोटी रुपये आहे. ही कार १५ जानेवारी रोजी लाँच होणार आहे. त्यामुळे या कारची किंमत खूप कमी होईल. गाड्याच्या किंमती सोबतच यूरोपमधून आयात होणाऱ्या व्हिस्की, स्कॉच, आणि वाईन (दारू) सुद्धा स्वस्त होणार आहे. टॅक्स कमी केल्यास कार व दारूची मागणी वाढेल, त्यामुळे विक्री चांगली होईल, त्यामुळे सरकारच्या मिळकतीत कोणताही तोटा होणार नाही, असे सरकारला वाटत असल्याने हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.