
ढाका (): जर भारताने घुसखोर बांगलादेशी नागरिकांची यादी आम्हाला दिली, तर आम्ही सर्व बांगलादेशी नागरिकांना बांगलादेशात बोलावू,अशी भूमिका बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी स्पष्ट केली आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यानचे संबंध चांगले असून या संबंधांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही असेही मोमेन यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत (एनआरसी) विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना मोमेन यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे भारतात घुसत आहेत गेल्या आठवड्यात बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री मोमेन यांचा नियोजित भारत दौरा त्यांनी रद्द केला होता. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हा भारताचा अंतर्गत मामला आहे आणि याचा बांगलादेशवर कोणताही परिणाम होणा नाही , असे ते म्हणाले. काही भारतीय नागरिक आर्थिक कारणामुळे बेकायदेशीरपणे बांगलादेशात घुसखोरी करत असल्याचेही ते म्हणाले. जर आमच्या नागरिकांव्यतिरिक्त इतर कुणी घुसखोरी केल्यास आम्ही अशांना परत पाठवू, असेही मोमेन प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. 'भारतात राहणाऱ्या बेकायदेशीर नागरिकांना जागा देणार' आम्ही बांगलादेशी नागरिकांना परत येण्याची परवानगी देणार असल्याचे मोनेन म्हणाले. कारण त्यांना आपल्या देशात प्रवेश करण्याचा अधिकार आहे असे ते म्हणाले. आपण भारताचा दौरा का रद्द केला, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आपण सध्या अतिशय व्यग्र असून परराष्ट्र राज्यमंत्री शहरयार आलम आणि मंत्रालयाचे सचिव उपलब्ध नसल्याने आपण हा दौरा रद्द केला आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रद्द केला होता भारतदौरा मोमेन आणि गृहमंत्री असदुज्जमां खान यांनी संसदेत वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पारित झाल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्यांनी आपला दौरा रद्द केल्याचे दिल्लीतील एका सूत्राने सांगितले. बांगलादेशात धार्मिक अल्पसंख्याकांवर अत्याचार होतो हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे आपला दौरा रद्द करण्यापूर्वी मोमेन यांनी म्हटले आहे. मोमेन यांनी दौरा रद्द झाल्याची माहिती भारत सरकारला कळवली असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.