
ढाका: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील अनेक दिग्गज खेळाडू विविध देशातील टी-२० स्पर्धेत खेळत असतात. अशा स्पर्धेतील त्यांची कामगिरी अनेक वेळा चर्चेत येत असते. अशाच एका खेळाडूच्या कामगिरीची चर्चा सध्या क्रिकेट जगतात सुरु आहे. विशेष म्हणजे या खेळाडूने 'शतकी' खेळी केली आहे. पण अशी शतकी खेळी जगातील कोणत्याही फलंदाजाला करावी वाटणार नाही. ढाका येथे सध्या बांगलादेश प्रीमिअर लीग ()स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत ढाका प्लाटून ()कडून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी () देखील खेळत आहे. स्पर्धेत राजशाही रॉयल्स ( Rajshahi Royals) विरुद्धच्या सामन्यात आफ्रिदीने एक अनोखा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे असा विक्रम जगातील कोणत्याही फलंदाजाला स्वत:च्या नावावर असावा असे वाटणार नाही. राजशाही रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात आफ्रीदी शून्यावर बाद झाला. क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याची आफ्रिदीची ही शंभरावी वेळ ठरली आहे. ढाका प्लाटूनकडून खेळण्यास आलेल्या आफ्रिदीने रवी बोपाराच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. ढाका प्लाटूनने प्रथम फलंदाजी १३४ धावा केल्या. रॉयल्सने विजयाचे लक्ष्य १० चेंडू शिल्लक ठेवून पार केले.
या सामन्यानंतर चर्चा सुरु झाली ती आफ्रिदीच्या विक्रमाची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केल्यास, सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजीत आफ्रिदी नवव्या स्थानावर आहे. आफ्रिदी ४४ वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याच्या सोबत भारताचा जहीर खान, शेन वॉर्न हे देखील प्रत्येकी ४४ वेळा शून्यावर बाद झाले आहेत. शून्यावर बाद होण्याचे शतक बांगलादेश प्रिमिअर लीगमध्ये शून्यावर बाद झाल्यानंतर आफ्रिदीच्या नावावर कोणालाही नको वाटेल अशा विक्रमाची नोंद झाली. संपूर्ण क्रिकेट करिअरमध्ये शून्यावर बाद होण्याची त्याची १००वी वेळ ठरली आहे. आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४४ वेळा तर लिस्ट ए, प्रथम श्रेणी आणि टी-२० सामन्यात ५६ वेळा शून्यावर बाद झाला आहे. क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याचे शतक करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. गोलंदाजीत शानदार कामगिरी करणारा मुरलीधरन ४९५ सामन्यात ५९ वेळा शून्यावर बाद झाला आहे.