पाद्रींकडून १७५ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 23, 2019

पाद्रींकडून १७५ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण

https://ift.tt/391bXOB
सिटी: रोमन कथलिक चर्चच्या मेक्सिको शाखेशी संबंधित पाद्रींवर अनेक अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करण्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. शनिवारी प्रकाशित झालेल्या या संदर्भातील एका अंतरिम अहवालात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोप झालेल्या विविध चर्चच्या पाद्रींनी किमान १७५ अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केले असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार, लीगनरीज ऑफ ख्राइस्टचे संस्थापक मार्शियल मॅसिएल यांनी तब्बल ६० अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केले होते असेही अहवालात म्हटले आहे. या अहवालामुळे खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सन १९४१ पासून आतापर्यंत एकूण ३३ पाद्रींनी किशोरवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालात सन १९४१ ते १६ डिसेंबर २०१९ पर्यंत झालेल्या अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणाच्या अनेक प्रकारांची माहिती देण्यात आली आहे. या पीडित अल्पवयीन मुलांमध्ये ११ ते १६ वयोगटातील किशोरवयीन मुलांचा समावेश आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे लैंगिक शोषण एकूण ३३ पाद्रींनी केले आहे. या ३३ पाद्रींपैकी १८ पाद्री आजही विविध संघटनांमध्ये सक्रिय आहेत, हे विशेष. मात्र, त्यांना जनता किंवा अल्पवयींन मुलांच्या संपर्कात येण्याचा मज्जाव करण्यात आला आहे. २००८ मध्ये झाला मॅसिएलचा मृत्यू लीगनरीज ऑफ ख्राइस्टचे संस्थापक मार्शियल मॅसिएल याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लागल्यानंतर पोप बेनेडिक्ट यांनी सन २००६ मध्ये मॅसिएल याला मरेपर्यंत प्रार्थनेच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा आदेश दिला होता. मार्शियल मॅसिएल याचा सन २००८ मध्ये मृत्यू झाला. मॅसिएलवर ज्या लोकांनी आरोप केले त्या लोकांचा त्याने कधीही सामना केलेला नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.