गिरीश कुलकर्णी-सयाजी शिंदे 'या' सिनेमात एकत्र - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 23, 2019

गिरीश कुलकर्णी-सयाजी शिंदे 'या' सिनेमात एकत्र

https://ift.tt/2sY8r6Y
मुंबई: अभिनेते आणि मराठी चित्रपटसृष्टीत या दोन्ही कलाकारांचा स्वतंत्र चाहता वर्ग आहे. या दोन्ही मातब्बर कलारांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी आता रसिकांना मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटात एकत्र आले आहेत. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित '' या चित्रपटात हा योग जुळून आला आहे. 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' या चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे हे दोघेही अभिनेते अतिशय महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात रंगणार आहे. हा चित्रपट पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर बेतला आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. अनेक मातब्बर कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. त्यात गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे यांचाही समावेश आहे. आतापर्यंत कधीच हाताळला न गेलेला विषय या 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' मध्ये मांडण्य़ात आला आहे. फटमार फिल्म्स एलएलपी या निर्मिती संस्थेकडून 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी'ची निर्मिती करण्यात येत आहे. 'सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसह काम करायला मिळणं ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. आतापर्यंत या दोन्ही अभिनेत्यांनी केलेलं काम पाहिलं अाहे. त्यामुळे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीतील भूमिकांसाठी सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी महत्त्वाचे आहेत. त्यांच्या अभिनयाची क्षमता मोठी आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीच.. पण या निमित्ताने प्रेक्षकांना अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळेल,' असं सागर वंजारी आणि प्रसाद नामजोशी यांनी सांगितलं.