'विक्रम'ला शोधलं कुणी? इस्रोच्या दाव्यानं ट्विस्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 4, 2019

'विक्रम'ला शोधलं कुणी? इस्रोच्या दाव्यानं ट्विस्ट

https://ift.tt/37WQypg
चेन्नई: भारताच्या अंतराळ मोहिमेतील महत्वाकांक्षी चांद्रयान २च्या विक्रम लँडरचे अवशेष आणि चंद्राच्या भूपृष्ठावरील ठिकाणाचा शोध लावल्याचा दावा अमेरिकेच्या 'नासा'नं केला. त्याचं श्रेय नासानं चेन्नईच्या षण्मुग या इंजिनीअरला दिलं. 'नासा'च्या या दाव्यावर इस्रोचे प्रमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इस्रोनं यापूर्वीच विक्रम लँडरच्या ठिकाणाचा शोध लावला असून, त्याची माहिती संस्थेच्या वेबसाइटवर दिली होती, असं सिवन यांनी म्हटलं आहे. चेन्नईचा इंजिनीअर षण्मुग यानं अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'नं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील टिपलेल्या छायाचित्रांमधून विक्रम लँडरच्या अवशेषांचा शोध लावला होता. 'विक्रम'चे अवशेष आणि ज्या ठिकाणी त्याचा शोध घेण्यात शास्त्रज्ञांना मदत केल्याबद्दल नासानं षण्मुगचं कौतुक केलं होतं. मात्र, आम्ही यापूर्वीच अवशेष आणि विक्रम लँडरची जागा शोधल्याचा दावा इस्रोनं केला आहे. आमची वेबसाइट जाऊन बघा: सिवन 'आमच्या ऑर्बिटरनं विक्रम लँडरचं ठिकाण शोधलं होतं. आमच्या संस्थेच्या वेबसाइटवर याआधीच त्यासंबंधी घोषणा केली होती. हवं तर तुम्ही वेबसाइटवर जाऊन बघू शकता,' असं के. सिवन यांनी सांगितलं. २२ जुलैला लाँच केलं होतं. ७ सप्टेंबरला विक्रम लँडरची सॉफ्ट लँडिंग चंद्रावर होणार होती. मात्र, २.१ किलोमीटरवर असताना लँडरचा संपर्क तुटला होता. त्यानंतर नासा आणि या दोन्ही संस्था त्याच्या ठिकाणाचा शोध घेत होत्या. इस्रोनं केलं होतं ट्विट, वेबसाइटवरही अपडेट इस्रोनं १० नोव्हेंबरलाच आपल्या वेबसाइटवर विक्रम लँडरसंबंधी माहिती दिली होती. तसंच ट्विटही केलं होतं. विक्रम लँडरचा ठावठिकाणा सापडला आहे, मात्र त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असं इस्रोनं म्हटलं होतं. विक्रम लँडर कुठे आहे हे चांद्रयान २च्या ऑर्बिटरनं शोधून काढलं होतं. पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असं इस्रोनं स्पष्ट केलं होतं.