लज्जास्पद! मुंबईत ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 4, 2019

लज्जास्पद! मुंबईत ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

https://ift.tt/2RgUvzh
मुंबई: हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि तिच्या हत्येच्या घटनेनं अवघा देश हादरला असतानाच, मुंबईत सहा वर्षांच्या मुलीवर एका व्यक्तीनं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं आतापर्यंत महिला आणि मुलींसाठी सुरक्षित असलेलं शहर हे असुरक्षित बनलं असल्याचं चित्र आहे. हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची जाळून हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचे पडसाद मुंबईसह महाराष्ट्रील विविध भागांत उमटले. विविध संघटना, संस्थांनी या घटनेचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या घटनेमुळं अवघं देश हादरलं असतानाच, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील परिसरात सहा वर्षांच्या बालिकेवर एका नराधमानं बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 'एएनआय'नं यासंबंधी वृत्त दिलं आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवला असून, त्याला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीची चौकशी करण्यात येत असून, त्याचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. मुंबई महिला-मुलींसाठी असुरक्षित! देशातील सर्वाधिक सुरक्षित शहरांपैकी एक अशी ओळख असलेले मुंबई शहर आता मुली आणि महिलांसाठी असुरक्षित बनू लागल्याचे चित्र आहे. मुंबईत २०१८-१९ या वर्षात बलात्काराच्या घटनांमध्ये २२, तर विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये ५१ टक्के वाढ झाली आहे. बलात्काराच्या एकूण घटना पहिल्या, तर अत्याचार झालेल्या ६९ टक्के मुली या अल्पवयीन आहेत. विशेष म्हणजे, महिलांवर अत्याचार करणारे ९० टक्के आरोपी हे ओळखीचेच असल्याची धक्कादायक बाब एका संस्थेनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.