दिल्लीत पुन्हा आगीचे तांडव, ९ जणांचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 23, 2019

दिल्लीत पुन्हा आगीचे तांडव, ९ जणांचा मृत्यू

https://ift.tt/2QcGjVH
नवी दिल्ली: दिल्लीतील किरारी ग्राउंड येथे असलेल्या एका कपड्यांच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत ९ जणांचा मृत्यू झाला. ही भीषण आग मध्यरात्री १२ वाजल्यानंतर लागल्याचे सांगण्यात येत आहे. एका तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर हे कपड्यांचे गोदाम होते. ही आग परसरल्यानंतर इमारतीमधील घरांमधील सिलेंडरचा स्फोट झाले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण आगीत सुमारे १० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या आगीबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही इमारत ४ मजली असून इमारतीच्या तळमजल्यावर कपड्यांचे गोदाम आहे. इथेच प्रथम आग लागली. गोदामात असलेल्या एका सिलेंडरचा स्फोट झाला. या आगीत मृत्यू पावलेले सर्वजण वरच्या मजल्यावर झोपले होते. खाली आग लागल्यानंतर त्यांना पळून जाण्याची संधीच मिळाली नाही. या आगीत ते होरपळून मृत्यूमुखी पडले. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अजूनही कळू शकलेले नाही. एका पीसीआर कॉलद्वारे या आगीची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. पहिल्यांदा इमारतीमधील एका घरात आग लागल्याची माहिती आम्हाला देण्यात आली. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा ही आग गोदामाला लागल्याचे आम्हाला दिसले. आग लागली तेव्हा काही लोक गोदामात झोपले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमींना संजय गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याच महिन्यामध्ये ८ डिसेंबर या दिवशी दिल्लीच्या अनाजमंडी परिसरातील एका कारखान्यामध्ये भीषण आग लागली होती. या आगीत एकूण ४४ कामगारांचा मृत्यू झाला होता. या व्यतिरिक्त १५ डिसेंबर या दिवशीही दिल्लीतील शालीमार बाग परिसरात एका इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत तीन जेष्ठ महिलेचा मृत्यू झाला होता.