
मुंबई: चित्रपटाच्या यशानंतर निर्मात्यांनी 'रागिनी एमएमएस रिटर्न्स'या वेबसीरीजची निर्मिती केली. या वेबससीरीजला देखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता 'रागिनी एमएमएस रिटर्न्स-२' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या सीरीजचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आलाय. यात अॅक्शन, स्पस्पेन्स आणि बोल्डनेसचा तडका दिसून येतोय. १.५५ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये रागिनी श्रॉफ या मुलिची कथा दाखवण्यात आली आहे. रागिनीच्या भूमिकेत अभिनेत्री दिव्या अग्रावाल साकारात असून अतिशय बोल्ड रुपात ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बॅचलर पार्टीसाठी रागिनी तिच्या मैत्रिणींसोबत एका ठिकाणी ट्रीपसाठी जाते. त्याच ठिकणी एक मुलांचा ग्रुप देखील पार्टी करण्यासाठी आलेला असतो. हे सर्व एका हॉटेलमध्ये थांबतात. तिथून या कथेला सुरुवात होते. यानंतर अनेक रंजक असे ट्विस्ट पाहायला मिळतात. वरुण सूद वरुण सूद हॉटेल मालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. इथं पाहा ट्रेलर: वाचा: ' येत्या १८ डिसेंबरला ही वेबसीरीज पाहता येणार होणार असून सनी लिओनी देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या सीरीजमध्ये‘हॅलो जी’ हे गाणं आहे. आतापर्यंत युट्यूबवर या गाण्याच्या व्हिडिओ १ करोड पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं गायिक कनिका कपूरनं गायलं असून या गाण्यातील सनीचा डान्स चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. वाचा: