इराणचा अमेरिकी दूतावास, हवाईतळावर क्षेपणास्त्र हल्ला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 5, 2020

इराणचा अमेरिकी दूतावास, हवाईतळावर क्षेपणास्त्र हल्ला

https://ift.tt/2MWrkPb
बगदाद: इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेने शुक्रवारी सकाळी ड्रोनद्वारे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणी लष्करातील परदेशात काम करणाऱ्या अल्-कुद्स दलाचा शक्तिशाली कमांडर जनरल कासीम सुलेमानी मारला गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी रात्री उशिरा इराणने प्रतिहल्ला चढवला असून बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र तसेच मोर्टार डागण्यात आले आहेत. दुसरीकडे इराणमधील प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या जामकरण मशिदीवर लाल झेंडा फडकवण्यात आला असून यातून इराणने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारल्याचेच संकेत मिळत आहेत. दरम्यान, अमेरिकेच्या ठिकाणांना लक्ष्य करणारा कुणीही असला तरी त्याला हुडकून त्याचा खात्मा करण्यात येईल, अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इराकची राजधानी बगदादमधील ग्रीन झोनला इराणने लक्ष्य केले. अमेरिकी दूतावासाच्या आत क्षेपणास्त्र डागण्यात आले. या हल्ल्यात जीवितहानी झाल्याचे अद्याप कोणतेही वृत्त नाही. या हल्ल्यानंतर बगदादमध्ये अमेरिकेच्या विमानांच्या घिरट्या सुरू झाल्या आहेत. दरम्यान, इराकच्या मध्यवर्ती भागातील बलाद हवाईतळावरही क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला आहे.