
नवी दिल्लीः शाओमीचा नवीन वर्षातील पहिला सेल १ जानेवारीपासून सुरू झाला आहे. हा सेल ८ जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये , रेडमी के२० सीरिज, पोको एफ१ आणि रेडमी नोट ७ एस या स्मार्टफोन्सवर चांगला डिस्काउंट दिला जात आहे. तसेच हा फोन खरेदी करण्यासाठी नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला जात आहे. रेडमी ८ए, रेडमी गो, रेडमी वाय३ आणि रेडमी ७ए या स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. शाओमीच्या या सेलमध्ये रेडमी नोट ७ प्रो स्वस्तात मिळत आहे. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजचा फोन ९ हजार ९९९ रुपयांत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. म्हणजेच या फोनच्या किंमतीत ४ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. तर १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. नोट ७ एस च्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आणि ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीत २ हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. नोट ७ एस या दोन्ही फोनची खरी किंमत ९ हजार ९९९ रुपये व ११ हजार ९९९ रुपये आहे. शाओमीच्या या सेलमध्ये रेडमी के२० वर २ हजारांपर्यंत सूट दिली जात आहे. ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २२ हजार ९९९ रुपये इतकी Mi.com वर उपलब्ध आहे. याची खरी किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. या सेलमध्ये पोको एफ१ च्या किंमतीत ४ हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. रेडमी एच्या २ जीबी रॅम व १६ जीबी स्टोरेजच्या फोनची किमत ४ हजार ९९९ रुपये आहे. तर २ जीबी रॅम ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ५ हजार ४९९ रुपये इतकी आहे. रेडमी गो स्मार्टफोनची किंमत ४ हजार २९९ रुपयांपासून सुरूवात होते. तर रेडमी ८ए ची सुरुवात ६ हजार ४९९ रुपयापासून सुरू आहे.