'या' धडाकेबाज फलंदाजावर एका वर्षाची बंदी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, January 2, 2020

'या' धडाकेबाज फलंदाजावर एका वर्षाची बंदी

https://ift.tt/2FeSFaM
नवी दिल्ली: मागील अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शतक ठोकून 'हिरो' ठरलेला सलामीवीर याला मोठा झटका बसला आहे. अंडर १६ आणि अंडर १९ स्पर्धांमध्ये खेळताना वयाची फेरफार केल्याचा ठपका कालरावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी डीडीसीएच्या लोकपालांनी त्याला एका वर्षासाठी निलंबित केलं आहे. त्याला रणजी क्रिकेट खेळता येणार नाही. अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कालरा यानं शतकी खेळी करून सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. मात्र, त्याला आता एका वर्षाच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले आहे. अंडर १६ आणि अंडर १९ मध्ये खेळत असताना, कथितरित्या वय लपवल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. लोकपालांनी त्याच्यावर कारवाई करत निलंबनाचे आदेश दिले. अशाच प्रकारे दिल्लीच्या संघाचा उपकर्णधार नितीश राणा यालाही काही दिवस खेळापासून दूर ठेवण्यात आलं आहे. कनिष्ठ स्पर्धेत खेळताना त्यानं वय लपवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. शिवम मावी संकटात अंडर १९ मध्ये खेळणाऱ्या शिवम मावीचं प्रकरणही बीसीसीआयकडे वर्ग करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ संघाचं तो नेतृत्व करतो. लोकपाल न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) बदर दुरेज अहमद यांनी आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी कालराबाबत आदेश दिला. कालराला या मोसमात रणजी खेळता येणार नाही. त्याच्यावर एका वर्षाची बंदी घातली आहे. शिखरची जागा घेणार होता... बीसीसीआयच्या माहितीनुसार, कालराचे वय २० वर्षे ३५१ दिवस आहे. गेल्या आठवड्यात तो दिल्ली अंडर १९कडून बंगालविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्यानं ८० धावा केल्या होत्या. रणजी संघात तो शिखरची जागा घेणार होता. मात्र, आता तो खेळू शकणार नाही.