भारत बंद Live: पश्चिम बंगालमध्ये ट्रेन अडवल्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 8, 2020

भारत बंद Live: पश्चिम बंगालमध्ये ट्रेन अडवल्या

https://ift.tt/2QwgYYg
मुंबई: नागरिकविरोधी धोरणाच्या निषेधार्थ १० केंद्रीय संघटनांनी आज '' पुकारला आहे. या देशव्यापी संपात २५ कोटी कामगार सहभागी होत असल्याचा दावा केंद्रीय कामगार संघटनांनी केला आहे. कामगारांच्या या संपाचा बँका, विशेषत: सरकारी बँका, वाहतूक आणि इतर सेवांवर परिणाम होणार आहे. पाहुयात संपाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स... Live अपडेट्स... >>मुंबई: आयआयटी पवईजवळ निदर्शने >>तामिळनाडू: चेन्नईच्या माउंट रोडवर आंदोलन सुरू आहे >> मुंबईत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या कामगारांची निदर्शने >> कर्नाटक: मदिकेरीमध्ये आंदोलकांनी कर्नाटक राज्य रस्ते परिवहन निगमच्या बसेसची तोडफोड >> केरळ: कामगार संघटनांनी पर्यटन क्षेत्राला 'भारत बंद'मधून वगळले >> देशातील सर्वसामान्य नागरिकांनी 'भारत बंद'मध्ये सहभागी होण्याचे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे आवाहन >> आंदोलकांनी पश्चिम बंगालमधील कंचरापारा येथे ट्रेन अडवल्या. >> १७५हून अधिक शेतकरी आणि कृषी कामगार संघटनांदेखील कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देणार आहेत >> फीवाढीची रचना आणि शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात आवाज उठविण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या सुमारे ६० संघटना आणि काही विद्यापीठांचे निवडून आलेले पदाधिकारीही संपात सहभागी होणार आहेत. >> महाराष्ट्रातील विविध सेवांवर या संपाचा मोठा परिणाम जाणवणार आहे. >> आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएच, सीआयटीयू, एआययूटीसी, टीयूसीसी, एसईडब्लूए, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूसी यांच्यासह अनेक कामगार संघटना या संपात सहभागी होतील. >> आज नागरिकविरोधी धोरणाच्या निषेधार्थ १० केंद्रीय कामगार संघटनांनी आज 'भारत बंद' पुकारला आहे.