ओप्पो A31 ट्रिपल कॅमेऱ्यासह लाँच, पाहा किंमत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 17, 2020

ओप्पो A31 ट्रिपल कॅमेऱ्यासह लाँच, पाहा किंमत

https://ift.tt/37AkB4N
नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पो (Oppo) ने ए सीरिजचा लेटेस्ट फोन () इंडोनेशियात लाँच केला आहे. युजर्संना या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले, दमदार प्रोसेसर आणि तीन रियर कॅमेरा मिळणार आहे. तसेच कंपनी रेनो ३ प्रोलाही मार्च मध्ये लाँच करणार आहे. कंपनीने ए३१ स्मार्टफोनला भारतात कधी लाँच करणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती सांगितली नाही. Oppo A31 ची किंमत कंपनीने या फोनची किंमत इंडोनेशियात १३ हजार ६०० रुपये ठेवली आहे. काळा आणि पांढरा अशा दोन रंगात फोन उपलब्ध केला आहे. Oppo A31 चे खास वैशिष्ट्ये ओप्पोने या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १५२० X७२० पिक्सल आहे. तसेच फोनमध्ये चांगला परफॉर्मन्स साठी मीडियाटेक हीलियो पी ३५ चिपसेट आणि ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. फोन अँड्रॉयड ९ पाय आधारित ६.१ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. Oppo A31 चा कॅमेरा या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिले आहेत. या फोनच्या फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये ४जी व्होल्ट, ब्लूटूथ, वायफाय, जीपीएस, ३.५ एमएम ऑडियो जॅक आणि यूएसबी पोर्ट यासारखे फीचर्स दिले आहे. तसेच ४,२३० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.