स्टाफ सिलेक्शन परीक्षा: १३०० पदांसाठी भरती - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 24, 2020

स्टाफ सिलेक्शन परीक्षा: १३०० पदांसाठी भरती

https://ift.tt/38SL7rr
नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशन () ने फेज ८ च्या भरतीकरिता अधिसूचना जारी केली आहे. या टप्प्यात एकूण १३०० हून अधिक पदे भरली जाणार आहे. यात DEO, क्लर्क, UDC, उपनिरीक्षक, कनिष्ठ संगणक, इन्स्ट्रक्टर (स्टेनोग्राफी) लॅब असिस्टंट, ऑफिस अटेंडंट, टेक्निकल ऑपरेटर, स्टोअर कीपर पासून डायटिशीअन पर्यंत विविध पदांसाठी भरती होत आहे. इच्छुक उमेदवारांनी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २० मार्च २०२० पर्यंत आहे. इच्छुकांना केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन (कर्मचारी निवड आयोग) च्या प्रादेशिक/उपप्रादेशिक कार्यालयांमध्ये अधिक माहितीसाठी संपर्क साधता येईल. थेट लिंक पुढीलप्रमाणे पाहता येईल - https://ssc.nic.in > Candidates Dashboard > Latest Notification > Phase-VIII/2020/Selection Posts > Post Details Link महत्त्वाच्या तारखा - ऑनलाइन अर्ज - २१ फेब्रुवारी २०२० ते २० मार्च २०२० अर्ज करण्याची अंतिम मुदत - २० मार्च २०२० रात्री २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन शुल्क भरण्याची अखेरची मुदत - २३ मार्च २०२० रात्री २३.५९ वाजेपर्यंत ऑफलाइन चलान भरण्याची अंतिम मुदत - २३ मार्च २०२० रात्री २३.५९ वाजेपर्यंत चलानच्या माध्यमातून पेमेंट करण्याची अखेरची मुदत - २५ मार्च २०२० (कार्यालयीन वेळेत) संगणकीकृत परीक्षेच्या तारखा - १० १० जून २०२० ते १२ जून २०२० शुल्क किती ? शुल्क १०० रुपये आहे. महिला उमेदवार, एससी, एसटी, दिव्यांग, एक्स सर्व्हिसमेन यांना शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. पेमेंट कसे करायचे? BHIM UPI, नेटबँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड किंवा स्टेट बँक ऑफ इंडियातून चलानच्या माध्यमातून शुल्क भरता येईल. प्रत्येक पदाच्या कॅटेगरीसाठी वेगळा अर्ज करायचा आहे.