मुंबई- अभिनेत्री सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती अनेक मुद्द्यांवर स्वत:ची मतं देत चर्चेत येत असते. नुकतंच तिचं विरोधातलं ट्वीट चर्चेत आहे. या ट्वीटमध्ये पायलने सोनमला मूर्ख म्हटलं आहे. पेटाच्या ट्वीटवरून सुरू झाला वाद- हे संपूर्ण प्रकरण India (People for the Ethical Treatment of Animals) च्या ट्वीटवरून सुरू झालं. पेटाने त्यांच्या ट्वीटमध्ये काही सेलिब्रिटींना टॅग केलं होतं. या पोस्टमध्ये त्यांनी लग्नात वापरण्यात येणाऱ्या घोड्यांना किती त्रास होतो हे सांगितलं होतं. यावर अभिनेत्री रिचा चड्ढाने लिहिलं की, सध्या तिच्या आणि अली फजलच्या लग्नाच्या चर्चा आहेत. पण ती लग्नात कोणताही बडेजावपणा करणार नाही असं वचन तिने या ट्वीटमध्ये दिलं. सोनमने दिलं उत्तर या ट्वीटमध्ये सोनम कपूरलाही टॅग करण्यात आलं. यावर सोनमने लिहिलं की, 'माझ्या नवऱ्याने याचसाठी लग्नात घोडा आणि लाउड म्युझिक ठेवलं नव्हतं. भडकली पायल रोहतगी सोनमचं हे उत्तर पायलला फारसं पटलं नाही. तिने सोनमच्या ट्वीटला रीट्वीट करत म्हटलं की, राम राम.. तू मांस खातेस मूर्ख. जनावरांना मारून त्यांचं मांस मिळतं. हा शाकाहार नाही. तुला लवकर अक्कल येईल हीच अपेक्षा.