जन्मदिवस भविष्यः उत्तरार्धात शुभफलदायक वर्ष - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 26, 2020

जन्मदिवस भविष्यः उत्तरार्धात शुभफलदायक वर्ष

https://ift.tt/2TenByx
आचार्य कृष्ण दत्त शर्माछोट्या पडद्यावरील अभिनेता प्रवेश राणा यांचा आज जन्मदिवस असून, आज वाढदिवस असणाऱ्यांना सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी उत्तमोत्तम हार्दिक शुभेच्छा... आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, जाणून घेऊया... आगामी वर्षात आपल्यावर मंगळ, बुध, चंद्र या ग्रहांचा प्रभाव राहील. आयात-निर्यात क्षेत्राशी संबंधित व्यापाऱ्यांना उर्वरीत महिना थोडासा क्लेशदायक जाईल. मार्च आणि एप्रिल महिन्यात समस्या दूर होऊन नव्या संधी प्राप्त होतील. काही प्रसंग आरशासारखे डोळ्यासमोर उभे राहतील. मे महिन्यात आर्थिक बाजू कमकुवत झालेली वाटेल. जून महिन्यात भाग्योदयाचा योग आहे. जुलै महिन्यात कौशल्य आणि मेहनतीमुळे हाती घेतलेली कामे सुलभपणे मार्गी लागतील. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात जीवनमान उंचावेल. आपल्या कार्याची आणि कौशल्याची सर्वत्र चर्चा होईल. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मन चिंताग्रस्त राहील. जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये चिंता दूर होऊन सुख, शांतता आणि समाधान लाभणाऱ्या घटना घडतील. गुंवणुकीतून लाभ होतील.