सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानाचा एरियल व्ह्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 19, 2020

सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानाचा एरियल व्ह्यू

https://ift.tt/2V3zwC0
नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान गुजरातमध्ये बांधण्यात आले आहे. येत्या २४ तारखेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या मैदानाचे उद्घाटन करतील. बीसीसीआयने या मैदानाच्या एरियल व्ह्यूचा फोटो शेअर केला आहे. अहमदाबाद येथील २०१५ मध्ये पाडण्यात आले आणि नव्याने बांधण्यास सुरूवात केली. जुन्या मैदानात ५३ हजार प्रेक्षक सामना पाहू शकत होते. आता या मैदानाची क्षमता १ लाख १० हजार इतकी करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विटवर या मैदानाचा एरियल व्ह्यू शे्अर केला आहे. वाचा- गुजरात असोसिएशनद्वारे बांधण्यात आलेले हे मैदान जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान आहे. या मैदानाची क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे. सध्या प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार करता मेलबर्न मैदान हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्टेडियम आहे. मेलबर्न मैदानावर एक लाख प्रेक्षक सामना पाहू शकतात. वाचा- या मैदानाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिले जात आहे. अमित शहा गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना स्टेडियमचे काम सुरू करण्यात होते. यासाठी ७०० कोटी इतका खर्च करण्यात आला आहे. लार्सन अॅन्ड टुब्रो या कंपनीने नव्या स्टेडियमची निर्मिती केली आहे. कंपनीने निर्मितीचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण केले आहे. मैदानात खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय सुविधा दिल्या आहेत.