सचिन तेंडुलकरकडून शिवरायांना खास मानवंदना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 19, 2020

सचिन तेंडुलकरकडून शिवरायांना खास मानवंदना

https://ift.tt/37Bh6ex
मुंबई: महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९० वी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून जगभरातून शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जात आहे. शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यामुळं सोशल मीडिया शिवमय झाला आहे. भारताचा विश्वविक्रमवीर फलंदाज यानंही ट्विटरच्या माध्यमातून महाराजांना मानवंदना दिली आहे. शिवाजी महाराजांचा एक फोटो ट्विट करून सचिननं तमाम शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'प्राणाची बाजी लावून स्वराज्यासाठी बेधडकपणे लढणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा...' असं सचिननं म्हटलं आहे. सोबतच #ShivajiMaharaj #ShivJayanti असे हॅशटॅगही दिले आहेत. वाचा: