जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने १०७ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा हिरो ठरला. त्याने हॅटट्रिकसह ५ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने कर्णधार अॅरोन फिंच (४२) , स्टिव्ह स्मिथ (४५) यांच्या जोरावर २० षटकात ६ बाद १९६ धावा केल्या. पाहा- विजयासाठी १९७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आफ्रिकेला अॅगरने एकापाठोपाठ एक धक्के दिले. त्याने आठव्या षटकात चौथ्या चेंडूवर फाफ डू प्लेसिस (२४) ची विकेट घेतली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर अँडिल फेहलुक्वायो याला शून्यावर आणि सहाव्या चेंडूवर डेल स्टेन याची विकेट घेत हॅटट्रिक साजरी केली. टी-२० क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा अॅगर हा दुसरा ऑस्ट्रेलियान गोलंदाज ठरला आहे. तर टी-२०च्या इतिहासात १३वा गोलंदाज आहे. अॅगरच्या फिरकी गोलंदाजीमुळे आफ्रिकेचा ८९ धावांवर ऑल आउट झाला. वाचा- २०१८ मध्ये चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी अॅगरवर बंदी घालण्यात आली होती. बंदीचा कालावधी संपल्यानंतर तो प्रथमच मैदानात उतरला होता. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाच्या नावावर आहे. त्याने दोन वेळी अशी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून ब्रेट लीने २००७-०८मध्ये हॅटट्रिक घेतली होती. टी-२० क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचा हा सलग आठवा विजय आहे. याआधी नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांचा पराभव झाला होता.