भाजपचे माजी आमदार मेहतांवर बलात्काराचा गुन्हा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, February 28, 2020

भाजपचे माजी आमदार मेहतांवर बलात्काराचा गुन्हा

https://ift.tt/386scID
ठाणे: भाजपचे माजी आमदार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मीरा-भाईंदर महापालिकेतील भाजपच्याच एका नगरसेविकेनं नरेंद्र मेहता यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. तशी तक्रारही त्यांनी कोकण महानिरीक्षकांकडं केली होती. त्याची दखल घेऊन मीरा-भाईंदर पोलिसांनी गुरुवारी रात्री ३ वाजून ३५ मिनिटांनी मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नरेंद्र मेहता यांच्यापासून माझ्या संपूर्ण कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. मेहता यांनी अनेक महिलांचं शोषण केल्याचा आरोपही या नगरसेविकेनं केला आहे. पीडित नगरसेविकेनं याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडंही तक्रार केली होती. मात्र, त्याकडं दुर्लक्ष केलं गेल्याचं त्यांचं म्हणणं होतं. पक्षाकडून न्याय न मिळल्यानं अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. मेहता यांच्यावरील आरोपांवरून महाविकास आघाडी सरकारनंही विधिमंडळात भाजपला घेरलं होतं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्वत: हा मुद्दा उचलला होता. त्यामुळं भाजपची मोठी कोंडी झाली होती.