
सातारा: सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवेंद्रराजेंना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. साताऱ्यातील ‘सुरुची’ बंगल्यावर असताना काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीनं साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. तिथं प्राथमिक उपचारानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात आलं आहे. त्यांच्यासोबत सध्या त्यांच्या पत्नी वेदांतिका राजे असल्याची माहिती आहे. साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच घरी सोडलं जाईल, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजतं.