नवी दिल्ली: निर्भया प्रकरणातील एक दोषी याने १६ फेब्रुवारी या दिवशी तरुंगातील भिंतीवर डोके आपटून स्वत:ला दुखापत करण्याचा केला प्रयत्न केला. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने वेळीच भिंतीववर डोके आपटणाऱ्या विनयला आवरले. भिंतीवर डोके आपटल्याने विनयच्या डोक्याला जखम झाली आहे. मात्र, ही किरकोळ जखम असल्याचे तुरुंग प्रशासनाने म्हटले आहे. या घटनेनंतर इतर सर्व दोषींच्या सुरक्षेबाबत तिहार तुरुंग प्रशासन सतर्क झाले आहे.