मीन: आर्थिक करार यशस्वी होतील; वाचा भविष्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 27, 2020

मीन: आर्थिक करार यशस्वी होतील; वाचा भविष्य

https://ift.tt/2T3rF67
- पं. डॉ. संदीप अवचट मेष : पती-पत्नीमध्ये वाद होतील. संयमाने सर्व परिस्थिती नियंत्रणात ठेवा. सभोवतालच्या लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठराल. वृषभ : सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यानेच प्रगती साधू शकाल. आर्थिक व्यवहार दक्षतेने करा. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा. मिथुन : छोट्या व्यावसायिकांना अनुभवी लोकांकडून मोलाचे मार्गदर्शन मिळेल. सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करा. आळस वाढविणारा दिवस. कर्क : कौटुंबिक कलहाचे कारण बनू नका. अधिकारशाही गाजविणे घातक ठरेल. नवीन योजना किंवा संकल्प सुरू करताना चाणाक्षपणे सर्व बाबी तपासून घ्या. सिंह : काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे उत्तम राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या सल्ल्यामुळे मित्र अडचणीतून बाहेर येईल. कन्या : परिवारातील इतर लोकांकडून निराशा होईल. तुमच्या मताला महत्त्व दिले पाहिजे, हा आग्रह सोडावा लागेल. कामांच्या आखणीमध्ये बदल करावा लागेल. तुळ : जीवनाकडे बघताना प्रेमळवृत्ती जागृत ठेवा. अवाजवी खर्चाला पायबंद घाला. न बदलणाऱ्या वस्तुस्थितीचा अधिक विचार करू नका. वृश्चिक : आध्यात्मिक गुरूंची भेट होईल. मित्राच्या सहकार्यामुळे आर्थिक लाभ होतील. वैयक्तिक पातळीवर आनंददायी घटना घडतील. धनु : धनलाभाचे योग जुळून येतील. परिवाराबरोबर निसर्गरम्य सहलीला जाणे होईल. आज ग्रहताऱ्यांची उत्तम साथ लाभेल. मकर : प्रामाणिकपणे काम केल्यास नोकरीत बढती मिळेल. फावल्या वेळात आवडते छंद जोपासाल. महत्त्वाच्या कामांचा विसर पडेल. कुंभ : सभोवताली घडणाऱ्या सर्व गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करा. कार्यालयीन कामकाज करताना सतर्क राहा. वादविवाद होईल असे वर्तन टाळा. मीन : क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी व्हाल. महिलांचा घरगुती साफसफाईसाठी वेळ खर्च होईल. आर्थिक करार यशस्वी होतील.