
मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीच्या मुद्द्यावरून गदारोळ झाल्यानं पहिल्या दिवसाचं कामकाज अवघ्या काही मिनिटांतच तहकूब करावं लागलं होतं. दुसऱ्या दिवशी विरोधक नेमका कोणता मुद्दा हाती घेणार, याकडं लक्ष लागलं आहे. लाइव्ह अपडेट्स: >> महाविकास आघाडीच्या सरकारला सत्तेत येऊन दोनच महिने झाले आहेत. त्यामुळं थोडा अवधी मिळायला हवा. मात्र, काही लोकांना फारच घाई झालेली आहे - अजित पवारांचा भाजप नेत्यांना टोला >> विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप नेते चंद्रकांत पाटील आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी होणार >> राज्यातील ४०० तहसील कार्यालयांसमोर भाजप आज आंदोलन करणार >> भाजपला भविष्यात कुठलंही आंदोलन करावं लागणार नाही असं काम करू - अजित पवार >> चर्चेतून प्रश्न सोडवण्यासाठी विरोधक सहकार्य करतील, अजित पवार यांची अपेक्षा >> राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस