नवी दिल्लीः टिकटॉकवर सध्या एक चॅलेंज तुफान व्हायरल होत आहे. परंतु, हे चॅलेंज जिवावर बेतू लागले आहे. टिकटॉकवर व्हायरल होत असलेल्या '' ला ट्रिपिंग प्रँक नावाने ओळखले जाते. हे चॅलेंज स्वीकारणारे अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे टिकटॉकच्या या नव्या चॅलेंजमुळे पालकांना धडकी भरली आहे. या चॅलेंजमध्ये तीन जण एकमेकांच्या बाजुला उभे राहतात. यातील मध्यभागी उभा असलेली व्यक्तीला अन्य दोघे जण पायात पाय घालून खाली पाडतात. त्यामुळे मध्यभागी असलेली व्यक्ती खाली पडते. व त्यात गंभीर जखमी होते. त्यामुळे अशा चॅलेंजला बळी पडू नका. किंवा ते स्वीकारण्याची चूक करू नका, असे आवाहन करण्यात येत आहे. या चॅलेंजमध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाली असून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. टिकटॉकचे हे चॅलेंज सर्वात जास्त लहान मुलांसाठी धोकादायक आहे. लहान मुलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना कायमचे अपंगत्व येऊ शकते. किंवा यात त्यांचा जीव जाऊ शकतो, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. वर दिलेल्या एका ट्विटच्या व्हिडिओत तीन तरूण दिसत आहेत. या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतेय की, खाली पडलेला तरुण अखेरपर्यंत उठला नाही. त्यामुळे यावरून अंदाज बांधला जाऊ शकतो की त्या तरुणांला गंभीर दुखापत झाली आहे. तो बेशुद्ध पडला आहे. यासारखे व्हिडिओ भारतात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. वर यासारखे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. यात शाळा-कॉलेजमधील मित्र आपल्या मित्रासोबत यासारखे व्हिडिओ करीत आहेत. या व्हिडिओमधून अद्याप कोणाचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली नसली तरी यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.