निर्भयाच्या दोषींची जगण्यासाठी धडपड सुरूच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 2, 2020

निर्भयाच्या दोषींची जगण्यासाठी धडपड सुरूच

https://ift.tt/2whXH5e
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना ३ मार्च रोजी फाशी दिली जाणार आहे. परंतु, फाशीची ही तारीखदेखील टळण्याची शक्यता आहे. दोषी पवन यानं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही कोर्टानं फेटाळली तरीदेखील दोषी पवनजवळ दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असेल, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे. ही दया याचिका फेटाळली गेल्यानंतर दोषी पवन याच्या फाशीसाठी नवीन तारीख दिली जाईल. सध्या दोषी पवन व्यतिरिक्त इतर दोषी मुकेश, विनय आणि अक्षय यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. परंतु, दोषी पवन याच्याकडे अजूनही हा पर्याय उपलब्ध आहे. गेल्या आठवड्यात दोषी पवन याच्याकडून क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर सोमवारी २ मार्च म्हणजेच आज सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, निर्भयाच्या चारही दोषींना फासावर लटकावण्यासाठी ३ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आलीय. कायदेतज्ज्ञ नवीन शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, आज न्यायालयानं पवनची क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळली तरी त्याच्याकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्याला ही दया याचिकाही ३ मार्चपूर्वी अर्थात आजच दाखल करावी लागेल. कायद्यानुसार, दया याचिका दाखल केलेल्या कोणत्याही दोषीला ती फेटाळण्यात येईपर्यंत फासावर चढवता येत नाही. दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर १४ दिवसांनंतर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकते. त्यामुळे पवननं दया याचिका दाखल केली तर ती फेटाळून त्याला फासावर चढवण्यासाठी २० मार्चचा दिवस उजाडू शकतो. दोषी पवननं याआधी, घटना घडली त्यावेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. परंतु, हा दावा सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला होता.