वृश्चिक: आरोग्य उत्तम; वाचा, आजचं राशीभविष्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 4, 2020

वृश्चिक: आरोग्य उत्तम; वाचा, आजचं राशीभविष्य

https://ift.tt/3cvsFHx
- पं. डॉ. संदीप अवचट मेष : उधार दिलेली रक्कम प्राप्त होईल. योग अथवा ध्यानधारणेने ताजेतवाने वाटेल. पूर्व आयुष्यातील सुखद आठवणींमध्ये रमून जाल. वृषभ : वैवाहिक आयुष्यात प्रेमाचे वातावरण राहील. घरातल्यांसाठी वेळ काढाल. परदेशात वास्तव्य असणाऱ्यांसाठी दिवस आर्थिकदृष्ट्या लाभाचा. मिथुन : उत्साह आणि आत्मविश्वासाने कार्यरत राहाल. धनलाभाचे प्रमाण वाढेल. घरातील समस्या, अडचणी सोडविण्यात यश मिळेल. कर्क : सहजीवनात गैरसमज होण्याची शक्यता. महत्त्वाची माहिती विचारपूर्वक सांगा. कायदेशीर तरतुदी पूर्ण करण्यासाठी दिवस प्रतिकूल. सिंह : आजी-आजोबांचे भरपूर प्रेम मिळेल. दिवस सर्वार्थाने लाभदायक ठरेल. व्यसनाधीनता टाळा. कन्या : न्यायालयीन प्रकरणात यशस्वी व्हाल. प्रिय व्यक्तीची नाराजी मानसिक अस्वस्थता वाढवेल. नोकरदारांसाठी कौतुकाचा दिवस. तुळ : शिस्तशीरपणे कामे करण्याकडे कल असेल. आसपासच्या लोकांना योग्य प्रकारे काम करून दाखवाल. जोडीदार भावना समजून घेण्यात कमी पडेल. वृश्चिक : व्यवसायातील खेळते भांडवल सहजपणे उभे राहील. आरोग्य उत्तम राहील. घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. धनु : करिअरच्या दृष्टीने जबाबदारीने पावले उचला. माता-पित्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जीवनसाथीच्या आरोग्याची चिंता सतावेल. मकर : सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचा अपव्यय करणे टाळावे. लहान भावंडांशी वाद होतील. कुंभ : मुला-मुलींच्या संदर्भात भाग्यकारक घटना घडेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आपल्यामधील कलागुणांना वाव मिळेल. मीन : अवघड परिस्थितीवर मात करून यशस्वी व्हाल. घरातील डागडुजीची कामे पूर्ण कराल. आज लोकांमध्ये मन रमणार नाही.