तुळ: नफा वाढेल; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 7, 2020

तुळ: नफा वाढेल; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

https://ift.tt/3cBkZ6M
- पं. डॉ. संदीप अवचट मेष : नोकरीत महत्त्वाच्या कामांची त्वरित पूर्तता करा. प्रिय व्यक्तीसाठी वेळ काढावा लागेल. आरोग्य उत्तम राहील. वृषभ : सकारात्मकतेने वावरा. स्थावर मालमत्तेविषयक कामे होतील. कार्यालयातील कामांची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. मिथुन : संततीबरोबर वेळ घालवाल. प्रिय व्यक्तीचा रुसवा काढावा लागले. वाहन चालविताना विशेष दक्षता घ्या. कर्क : संततीच्या वर्तनामुळे निराश व्हाल. प्रकृतीस्वास्थ्य जपा. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. सिंह : व्यवसायात नवीन संकल्प राबविण्यापूर्वी विश्वासू व्यक्तीचा सल्ला घेणे श्रेयस्कर. धनविषयक चिंता सतावेल. जोडीदाराशी वाद नकोत. कन्या : महत्त्वाच्या कामात अपेक्षित यश लाभेल. प्रकाशझोतात याल. संततीविषयक महत्त्वाचे निर्णय घेण्यास दिवस चांगला. तुळ : व्यवसायात नफ्याचे प्रमाण वाढेल. आधुनिक उपकरणांचा अधिक वापर करू नये. जोडीदाराकडून मनस्तापदायक स्थिती निर्माण होईल. वृश्चिक : प्रकृती स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता. वैद्यकीय सल्ला आवश्यक घ्या. अचानक धनलाभाचे योग येतील. धनु : वैयक्तिक आयुष्यात आनंददायी घटना घडेल. वाहने सावकाश चालवा. नोकरदार व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. मकर : कठीण प्रसंगात जोडीदाराची साथ उत्तमपणे लाभेल. नोकरदार व्यक्तींची वरिष्ठांकडून कानउघाडणी होण्याची शक्यता. वैद्यकीय खर्च उद्भवतील. कुंभ : धर्मादाय संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. चोरांपासून सावध राहा. चित्रपट अथवा नाटक पाहण्याचा आनंद घ्याल. मीन : प्रलंबित कामे पूर्ण कराल. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाची जबाबदारी सोपवतील. आनंदाची बातमी कानी पडेल.