मुंबईत गोदामाला भीषण आग, ७ अग्निशमन बंब घटनास्थळी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 5, 2020

मुंबईत गोदामाला भीषण आग, ७ अग्निशमन बंब घटनास्थळी

https://ift.tt/32SFszm
मुंबई: शहरातील जोगेश्वरी परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज गुरुवारी पहाटे घडली. अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी पोहोचले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जोगेश्वरी परिसरात गोदाम असून, आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीनं रौद्ररुप धारण केलं आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी सात बंबांसह घटनास्थळी पोहोचले. आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.