अहमदनगर: बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित महिला व तिच्या पतीला मारहाण करुन जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोमवारी मध्यरात्री दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीमध्ये दोन पोलिसांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. परंतु नावे देण्यात आलेली नाहीत. दोन महिन्यापूर्वी या महिलेला आरोपींनी मारहाण गावाजवळील रेल्वे पटरीवर टाकले होते. २०१६ मध्ये तिच्यावर अत्याचार झाला होता. याबाबत नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपी महिलेवर दबाव टाकत होते. काही दिवसांपूर्वी महिला व तिच्या पतीला मारहाण करण्यात आली होती. आरोपींनी व्हिडिओ देखील तयार केला. रात्री महिला दक्षता समितीच्या सदस्यांच्या उपस्थित गृह विभागाच्या उपअधीक्षका प्रांजल सोनवणे यांनी पीडिता आणि तिच्या पतीचा पंचासमक्ष जबाब नोंदवून घेतला आहे. तसेच आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न, अपहरण, लैंगिक शोषण आदी कलमांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा: