सिडनी: (icc womens t20 world cup ) मधील पहिल्या उपांत्य फेरीतील लढत भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. भारतीय संघाने स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने इंग्लंडचा पराभव केल्यात ते प्रथमच फायनलमध्ये प्रवेश करतील. Live अपडेट ()>> भारतीय संघाने ग्रुप फेरीतील सर्व सामने तर इंग्लंडने चार पैकी तीन सामने जिंकले आहेत >> सामना कमीत कमी १० षटकांचा झाला पाहिजे. पावसामुळे सामना न झाल्यास भारत अंतिम फेरीत दाखल होईल. >> सिडनीत पाऊस; सामना सुरू होण्यास उशीर होण्याची शक्यता>> भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ५ सामने झाले आहेत. त्यापैकी सर्व सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे.