करोना Live: करोना रुग्णांची संख्या ३१ वर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 6, 2020

करोना Live: करोना रुग्णांची संख्या ३१ वर

https://ift.tt/2wukX06
नवी दिल्ली: देशभरात रुग्णांची संख्या आता ३१वर पोहोचली आहे. या ३१ जणांपैकी ३ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. त्यांचा करोना पूर्णपणे बरा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ३१ पैकी १५ रुग्णांवर गुरुग्राम येथे उपचार सुरू आहेत. तर १० रुग्ण दिल्लीतील रुग्णालयात, १ रुग्ण तेलंगण आणि २ रुग्ण जयपूरमध्ये उपचार घेत आहेत. पाहुयात, करोनाबाबतचे अपड्ट्स... Live अपडेट्स... >> ईराणमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत ईराणमध्ये आज विशेष विमान पाठवणार >> भारतातील एकूण ३१ पैकी ३ रुग्ण बरे झाल्याचे सांगण्यात येत आहे. >> देशातील एकूण २१ विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी केली जात आहे. >> भारतात करोनाग्रस्तांची संख्या आता ३१ वर पोहोचली आहे. >> करोना: केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केली पाहणी