अयोध्या, उत्तर प्रदेश : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्येत दाखल होत आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगा हेदेखील असणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, उद्धव ठाकरे यांचा हा अयोध्येचा तिसरा दोरा आहे. >> सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास ठाकरे लखनऊमध्ये दाखल होतील त्यानंतर दुपारी ४.३० वाजता ते रामलल्लाचं दर्शन घेतील >> सकाळी ९.०० वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले >> सकाळी ८.४० मिनिटांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपल्या निवासस्थानाहून मुंबई विमानतळाकडे रवाना झाले.