Live करोना: भारतात २९ जण करोनाग्रस्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, March 5, 2020

Live करोना: भारतात २९ जण करोनाग्रस्त

https://ift.tt/2VLPKQk
नवी दिल्ली : संपूर्ण जगात करोना व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. भारतातही आत्तापर्यंत या व्हायरसचा संसर्ग झालेले २९ जण सापडले आहे. त्यामुळे भारतातही करोना व्हायरसचा धोका वाढल्याचं दिसतंय. LIVE अपडेट : >> नवी दिल्ली : 'इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी' अर्थात इरडानं विमा कंपन्यांना एक नवीन पॉलिसी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या नवीन पॉलिसीमध्ये करोना व्हायरसच्या उपचाराचा खर्चाचादेखील समावेश असेल. >> अमेरिका : सॅन फ्रान्सिस्कोहून हवाईला जाणाऱ्या क्रुज शिप 'ग्रॅन्ड प्रिन्सेस'मधून प्रवास करणाऱ्या २१ जणांमध्ये करोनाची लक्षणं आढळली आहेत. >> मंगळवारपर्यंत एकट्या चीनमध्ये करोनाचे २९८१ बळी तर जगभरात ३१०० पर्यंत पोहचली आहे.