नवी दिल्ली: पंतप्रधान कार्यालयातील हिंदू विरोधी असलेल्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा ताबा घेतला असून त्यांपैकी काही अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे राज्यसभेतील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यन स्वामी यांनी केला आहे. हिंदुत्व विरोधी असलेले हे अधिकारी शरद पवार यांच्या कन्या, खासदार यांच्याही संपर्कात असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करत हा खळबळजनक दावा केला आहे. हे राष्ट्रभक्त अधिकाऱ्यांना लक्ष करण्याचे काम करत आहेत. राष्ट्रभक्त अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करू पाहत आहेत, या मुळे हे अधिकारी राष्ट्रभक्त अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत असा अंगुलीनिर्देशही स्वामी यांनी केला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनापासून आपण काही तरी धडा शिकलाच पाहिजे असेही स्वामी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.