साडी नेसून खेळाडूने केली बॅटिंग; Video व्हायरल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, March 6, 2020

साडी नेसून खेळाडूने केली बॅटिंग; Video व्हायरल

https://ift.tt/3czR8M3
नवी दिल्ली: भारताची महिला क्रिकेटपटू मिताली राजचा एक व्हिडिओ गुरुवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मितालीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेटच्या मैदानावरील तिचा हा व्हिडिओ चर्चेत आला आहे. वाचा- मितालीने खेळतानाचा एक व्हिडिओ इस्टग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत मिताली साडीत क्रिकेट खेळत आहे. तुमच्या व्यक्तिमत्वापेक्षा खुप काही सांगते. ती तुम्हाला कधीच फिट होण्यास सांगत नाही. त्यामुळे येणाऱ्या महिला दिना निमित्ताने एक अनोखी सुरूवात करूया. या महिला दिनी स्वत:च्या नियमानुसार जगण्यास सुरूवात करूया, असे मितालीने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे. मितालीच्या या व्हिडिओचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे. मितालीने गेल्या वर्षी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. महिला वनडे संघाची जबाबदारी अद्याप मितालीकडेच आहे. वाचा- मितालीच्या या व्हिडिओवर युझर्स प्रतिक्रिया देत आहेत.