Live: नाशिक जिल्ह्यात ४४ नव्या रुग्णांची नोंद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, April 30, 2020

Live: नाशिक जिल्ह्यात ४४ नव्या रुग्णांची नोंद

https://ift.tt/35gcSsY
मुंबई: राज्यात बुधवारी ५९७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली असून बाधितांचा आकडा ९९१५ वर पोहोचला आहे. आतापर्यंत १५९३ बाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण वाढत असले तरी दुपटीनं वाढण्याचा वेग ७ दिवसांवरून १० दिवसांवर गेला आहे, ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी... लाइव्ह अपडेट्स: >> नाशिक जिल्ह्यात एकदम ४४ नव्या रुग्णांची नोंद... जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली माहिती >> रुग्ण दुपटीनं वाढण्याचा वेग मंदावला; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती >> आतापर्यंत १५९३ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज >> राज्यातील करोनाबाधितांचा आकडा १० हजारांच्या उंबरठ्यावर