विधान परिषद निवडणूक: भाजपमध्ये नाराजी वाढली! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 9, 2020

विधान परिषद निवडणूक: भाजपमध्ये नाराजी वाढली!

https://ift.tt/3bjtzFr
पुणे: भाजपची विधान परिषदेची उमेदवार यादी जाहीर झाल्यापासून पक्षातील नाराजांची रांग वाढतच आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यानंतर आता कोथरूडच्या माजी आमदार यांनीही अप्रत्यक्षरित्या नाराजी बोलून दाखवली आहे. एका कवितेच्या ओळी सोशल मीडियावर शेअर करून त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यापैकी चार जागा निवडून आणण्याची संधी भाजपला आहे. या चार जागांसाठी भाजपच्या काही मोठ्या नेत्यांसह इतरही नावं चर्चेत होती. मात्र, शेवटच्या क्षणी पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यामुळं डावलल्या गेलेल्यांची नाराजी आता समोर येऊ लागली आहे. पुण्यातील कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी 'आज फिर दिल ने एक तमन्ना की, आज फिर दिल को हमने समझाया...' अशा ओळी फेसबुकवर पोस्ट केल्या आहेत. आज पुन्हा एकदा मनाची समजूत घातली,' असं त्यांनी म्हटलं आहे. यांना मागील निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आपल्या जागेचा त्याग करावा लागला होता. त्यावरून बराच वादही झाला होता. कुलकर्णी यांच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र, नेत्यांच्या मनधरणीनंतर कुलकर्णी यांनी माघार घेतली. त्याचवेळी त्यांना विधान परिषदेच्या उमेदवारीचं आश्वासन दिलं गेल्याचं बोललं जात होतं. त्यामुळं यावेळी त्यांची वर्णी लागेल, अशी आशा होती. मात्र, त्यांची निराशा झाली. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हेच मांडलं आहे.