
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादः शहर परिसरात आणखी ४२ करोनाबाधित नव्याने आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १५४० झाली आहे. तसेच एका बाधिताचा शनिवारी (३० मे) सायंकाळी उपचारादरम्यान घाटी रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ७० झाली आहे. यापैकी ९७६ करोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आता ४९४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये भवानी नगर, जुना मोंढा येथील ४, कैलास नगर, गल्ली नं. दोन ३, एन-सहा, सिडको ३, जाफर गेट, जुना मोंढा १, गल्ली नं. १७, संजय नगर, मुकुंदवाडी १, गल्ली नं. चार, रहीम नगर, जसवंतपुरा १, व्यंकटेश नगर, जालना रोड १, समता नगर १, नवीन बायजीपुरा १, अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर १,किराडपुरा ३, पिसादेवी रोड १, बजाज नगर १, देवळाई परिसर १, नाथ नगर १, बालाजी नगर १, हमालवाडी १, जुना बाजार २, भोईवाडा १, मनजित नगर, आकाशवाणी परिसर २, सुराणा नगर १, अझम कॉलनी १, सादात नगर १, महेमुदपुरा, हडको १, निझामगंज कॉलनी १, शहागंज १, गल्ली नं. २४ संजय नगर १, बीड बायपास रोड १, स्वप्न नगरी १ व अन्य ठिकाणचे २ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे. यामध्ये २४ महिला आणि १८ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. घाटीत एका बाधिताचा मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) शहरातील निझामगंज कॉलनी येथील ५२ वर्षीय महिला रुग्णाचा शनिवारी (३० मे) सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ५९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, खासगी रुग्णालयात १० व जिल्हा सामान्य रुग्णालयात एका करोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण ७० करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने कळवले आहे.