फेसबुक, ट्विटरवर सरकारी नियंत्रण आणखी घट्ट; ट्रम्प यांचे आदेश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 29, 2020

फेसबुक, ट्विटरवर सरकारी नियंत्रण आणखी घट्ट; ट्रम्प यांचे आदेश

https://ift.tt/2XE7Lj3
वॉशिंग्टन: ट्विटरसोबत झालेल्या वादावादीनंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशामुळे सरकारी यंत्रणांना फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक अधिकार मिळणार आहेत. ट्विटर आणि ट्रम्प यांच्यातील वादानंतर हा आदेश काढण्यात आला आहे. या आदेशावर स्वाक्षरी केल्यानंतर ट्रम्प यांनी सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आमचा निर्णय हा भविष्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला असलेल्या गंभीर धोक्यापासून वाचवण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आदेशाविरोधात सोशल मीडिया कंपनी कोर्टातही अपील करू शकतात अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. या नव्या आदेशानुसार सोशल मीडियावरील जाहिरातींच्या खर्चाबाबतचा तपशील जाणून घेता येणार आहे. त्याशिवाय सोशल मीडियावर नियंत्रण येणार आहे. ट्विटरवर या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांचा आदेश हा राजकीय भूमिकेतून घेण्यात आला आहे. भविष्यात इंटरनेट स्वातंत्र्य आणि ऑनलाइन भाषण स्वातंत्र्यावर गदा येणार असल्याची भीती ट्विटरने व्यक्त केली. वाचा: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर मतदानासंदर्भात केलेली काही ट्विट्स फ्लॅग करून त्यांना 'फॅक्ट चेकिंग'चा इशारा दिला होता. त्यानंतर, ट्रम्प यांनी 'ट्विटर' परंपरावादी आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. असे काही घडण्यापूर्वी आम्ही नियम अधिक कडक करू,' असा इशारा दिला होता. त्यानंतर पुन्हा एक ट्विट करून त्यांनी ट्विटरवर कारवाईची धमकी दिली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. पुन्हा रात्री उशिरा त्यांनी आणखी एक ट्विट करून 'ट्विटर माथेफिरूपणा करत असून आता काय होते बघत राहा,' असे पुन्हा एकदा धमकावले होते. त्यानंतर सोशल मीडियावर नियंत्रण आणणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. आणखी वाचा: