बेरोजगारीला कंटाळून पित्यानंच मुलाचे हात बांधून नदीत फेकलं! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, May 30, 2020

बेरोजगारीला कंटाळून पित्यानंच मुलाचे हात बांधून नदीत फेकलं!

https://ift.tt/2TRXUF3
बालाघाट, मध्य प्रदेश : मध्यप्रदेशातील इथं शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय. एका पित्यानं आपल्या चिमुकल्या मुलाला हात बांधून वाहत्या नदीत फेकून दिलं. हा पिता आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी आपल्या चिमुकल्यासहीत घराबाहेर पडला होता. आरोपीचं नाव सुनील जयस्वाल असल्याचं समजतंय. सुनीलची मोठी मुलगी निशा हिचा शनिवारी वाढदिवस होता. त्याचनिमित्तानं सुनील आपल्या ८ वर्षांच्या मुलाला - प्रतिकला घेऊन घराबाहेर पडला. सुनीलनं मुलाला घेऊन बाजाराचा एक फेरफटका मारला. घरी परतताना मात्र त्यानं आपल्या मुलाचे दोन्ही हात बेल्टनं बांधले आणि त्याला नदीच्या केलं. यानंतर आपल्या घरी निघून गेला. निराश पित्यानं पश्चाताप व्यक्त करत मुलाला ठार मारल्याची कबुली दिली. त्यानंतर तो स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये पोहचला आणि आपल्या कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी पित्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. हातात कोणतंही काम नव्हतं. त्यामुळे कुटुंबाचं पालन-पोषण करण्यात आपण अयशस्वी ठरत होतो. त्यामुळे वंशच संपवून टाकण्यासाठी आपण मुलाची हत्या केल्याचं आरोपी पित्यानं पोलिसांना सांगितलं. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, काम नसल्यानं बेरोजगार सुनील सतत तणावाखाली होता. त्यातच त्यानं हे कृत्यं केलं. वाचा : वाचा :