ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्याला करोना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 8, 2020

ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्याला करोना

https://ift.tt/2YGpAA9
वॉशिंग्टन अमेरिकेत करोनाचं संकट दिवसेंदिवस वाढतच जात आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्यालाही करोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे जगातील सर्वात अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेचं कडं असणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनाही आता करोनाच्या चाचणीला सामोरं जावं लागलं आहे. सुदैवानं ट्रम्प यांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांना करोनाचा धोका लक्षात घेता ट्रम्प यांच्या समवेत असणाऱ्या सर्व व्यक्तींची करोना चाचणी आता अत्यंत काटेकोरपणे घेण्यात येत आहे. वाचा: अमेरिकेतील एका वृत्त वाहिनीच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या नौदलातील एका सदस्याला करोनाची लागण झाली आहे. व्हाइट हाउसमधील सुरक्षेत नौदलातील काही सदस्यांचाही समावेश असतो. अनेकदा हे सदस्य राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सतत संपर्कात येत असतात. राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांना जेवण वाढण्यापासून इतर काही दैनंदिन कामातही या सदस्यांचा समावेश असतो. कोणत्याही अत्यावश्यक परिस्थितीत राष्ट्रपतींची सुरक्षा करता येईल, असं खास प्रशिक्षण नौदलाच्या या विशेष तुकडीला देण्यात आलेलं असतं. वाचा: ट्रम्प यांच्या सुरक्षेतील याच तुकडीतील एका सदस्याला करोना झाल्यानं सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता निर्माण झाली आहे. ट्रम्प देखील या घटनेवर प्रचंड नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर व्हाइट हाउसमधील डॉक्टरांनी ट्रम्प यांची करोना चाचणी घेतली. ट्रम्प यांचा करोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. याचसोबत अमेरिकेचे उप-राष्ट्रपतींचीही करोना चाचणी यावेळी घेण्यात आली. ते देखील निगेटीव्ह आढळले आहेत. दुसऱ्याबाजूला अमेरिकेत करोनानं हाहा:कार केला आहे. आतापर्यंत अमेरिकेत करोनामुळं ७६,९२८ जणांचा बळी गेला असून तब्बल १२ लाख ९२ हजार ६२३ लोकांना करोनाची लागण झाली आहे.