...स्वतः राजकारण करताहेत; फडणवीसांचा CM ठाकरेंवर आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 25, 2020

...स्वतः राजकारण करताहेत; फडणवीसांचा CM ठाकरेंवर आरोप

https://ift.tt/36stv5j
मुंबई: रेल्वेगाड्यांच्या मागणीवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना, या वादात आता राज्यातील विरोधी पक्ष नेते यांनी उडी घेतली आहे. एकीकडे राजकारण करू नका म्हणायचं आणि आपण राजकारण करायचं हे योग्य नाही, असा आरोप फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल, रविवारी राज्यातील नागरिकांशी फेसबुक व्हिडिओद्वारे संवाद साधला. त्यावेळी स्थलांतरित मजुरांसाठी रोज ८० ट्रेन सोडण्याची मागणी केली असली तरी, प्रत्यक्षात रेल्वेकडून ४० ट्रेन सोडल्या जात आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर मजुरांची यादी आम्हाला द्या, असं उत्तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलं होतं. त्याचवेळी आर्थिक मदतीच्या पॅकेजवरूनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला होता. आता यात फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रासाठी आतापर्यंत ५२५ रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि त्यातून जवळपास साडेसात लाख श्रमिकांनी प्रवास केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आपलं अपयश झाकण्यासाठी वारंवार केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले. ज्या-ज्या वेळी ट्रेन सोडण्याची मागणी केली जात आहे, त्यावेळी त्या दिल्या जात आहेत. अशा प्रकारचे राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ट्रेन मागितल्या जातात, पण त्या मिळत नाहीत असं मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे खासदार सांगतात, पण ते चुकीचे आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील, तसेच मुंबईतील परिस्थिती बिकट होत आहे. कोविडवर कुठलंही नियत्रण मिळवता येत नाही. आपलं अपयश झाकण्यासाठी वारंवार केंद्राकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. राजकारण करू नका म्हणायचे आणि आपण स्वतः राजकारण करायचे हे योग्य नाही. केंद्र-राज्य सरकारने मिळून काम केले पाहिजे. त्यादृष्टीने अशा प्रकारचे राजकारण बंद केले पाहिजे, असेही ते म्हणाले.