जगातील सर्वात 'गलिच्छ' व्यक्तीचा मृत्यू, ६७ वर्षांत एकदाही आंघोळ नाही, चक्रावणारं कारण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 26, 2022

जगातील सर्वात 'गलिच्छ' व्यक्तीचा मृत्यू, ६७ वर्षांत एकदाही आंघोळ नाही, चक्रावणारं कारण

https://ift.tt/etPBoX4
इराण : इराणमधील अमू हाजी याला जगातील सर्वात घाणेरडी व्यक्ती मानली जात असे. या व्यक्तीने ६७ वर्ष पाण्याचा एक थेंबही अंगावर घेतला नव्हता. कारण त्याला पाण्याची भीती वाटत होती. आंघोळ केली तर आपण आजारी पडू, अशी भीती अमू हाजीला सतावत होती. अमू हाजीने स्वतःच्या आरोग्याबाबत बांधलेली धारणा काही अशी खरी ठरली, असं म्हणता येईल. कारण काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी त्यांला पहिल्यांदा जबरदस्ती आंघोळ घातल्यानंतरच त्याचा मृत्यू ओढावला. () मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणमधील रहिवासी अमू हाजी याचा मृत्यू झाला आहे. त्याचे वय ९४ वर्ष होते. जगातील सर्वात घाणेरड्या माणसाचा जागतिक विक्रम अमू हाजीच्या नावावर झाला. अर्धशतकाहून अधिक काळ अमू हाजीने पाण्याला हातही लावला नाही, स्वच्छतेची कोणतीही काळजी घेतली नाही. कधीही अंघोळ न करण्यामागील कारण म्हणजे चुकून आंघोळ केली तर आजारी पडण्याची भीती अमू हाजीला होती. कदाचित तो याबद्दल बरोबर होता, मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही महिन्यांपूर्वी लोकांनी त्याला पकडून आंघोळ घातली होती, त्यानंतर त्याची तब्येत बिघडू लागली आणि गेल्या रविवारी त्याचा मृत्यू झाला. () इराणच्या एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, अमू हाजीवर 'The Strange Life Of Amou Haji' नावाची डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली आहे. त्यात असं म्हटलं आहे की, अगदी लहान वयात अमू हाजीने स्वतःला संसार आणि लोकांपासून वेगळे केले होते. अनेक विक्रमांसह अमू हाजीचा आहारही तितकाच विचित्र होता. अमू अपघाताने किंवा नैसर्गिकरित्या मारल्या गेलेल्या प्राण्यांचे कुजलेले मांस खात असे. त्याला मांसाहार जास्त आवडायचा. जनावरांच्या कुजलेल्या मांसाव्यतिरिक्त, अमूला घाणेरड्या कुजलेल्या घरगुती भाज्यांचा कचरा देखील आवडायचा.