मुंबई: करोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजुरांसाठी केलेल्या कामामुळं 'रिअल' लाइफमध्येही हिरो ठरलेल्या अभिनेता याचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. राजकीय वर्तुळातूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी केवळ कौतुक न करता थेट सोनूच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. ( met ) वाचा: रोहित पवार यांनी सोनूशी झालेल्या भेटीचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. 'घर जाना हैं', हे स्थलांतरित मजुरांचे केवळ तीन शब्द ऐकून हजारो मजुरांना स्वगृही सुखरूप पोहोचवणाऱ्या सोनू सूद यांची आज भेट घेतली,' असं रोहित यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. विषाणूचा संसर्ग मार्च महिन्याच्या शेवटी देशात संपूर्ण पुकारण्यात आला. सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सुविधा बंद करण्यात आल्या. अत्यावश्यक सेवा वगळता प्रत्येक गोष्टीवर बंदी घातली गेली. अचानक पुकारण्यात आलेल्या या लॉकडाऊनमुळं मुंबईसह महाराष्ट्रात लाखो मजकूर अडकून पडले. काम नाही आणि राहण्याची धड सोय नाही यामुळं त्यांना गावाकडं जाण्याचे वेध लागले. दीड महिने हाल सोसल्यानंतर अखेर त्यांना आपापल्या गावाकडं जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, ती पुरेशी नव्हती. राज्य सरकार आपल्या परीनं मजुरांना सुखरूप सोडण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना बळ देण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था व मान्यवर पुढं आले. अभिनेता सोनू सूद हा त्यांच्यापैकीच एक होता. लॉकडाऊनमध्ये त्यानं हजारो मजुरांसाठी बसची व्यवस्था करून दिली आणि त्यांना सुखरूप घरी पोहोचण्यास मदत केली. वाचा: लॉकडाऊननंतर आता निसर्ग चक्रीवादळामुळं बाधित झालेल्या हजारो लोकांना सोनू सूदच्या टीमकडून मदत केली जात आहे. निवासाची जागा व खाण्यापिण्याचे पदार्थ दिले जात आहेत. सोनू सूदच्या या कामाचं अनेकांकडून कौतुक होत आहे. रोहित पवार यांनी सोनू सूद यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून राबवल्या जाणाऱ्या मदतकार्याची माहिती घेतली. रोहित पवारांच्या या भेटीनंतर ट्विटरवर काही लोकांनी त्यांना ट्रोलही केले. तुम्हीही असं काहीतरी करून दाखवा असा सल्लाही त्यांना देण्यात आलाय. तर, ह्यांना फक्त प्रसिद्धी पाहिजे. सरकारमध्ये असूनही तुम्ही हे का करू शकत नाही, अशी टीकाही काहींनी केली आहे.