मुंबई- मालिकेत लक्ष्मणाची व्यक्तीरेखा साकारणारे अभिनेते सोशल मीडियावर सध्या बरेच सक्रिय आहेत. रामायण मालिकात दुसऱ्यांदा प्रक्षेपित केल्यानंतर सुनील यांनी आतापर्यंत प्रेक्षकांना माहीत नसलेल्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नुकताच त्यांना स्वतःचा नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी रामलीला पाहायला गेल्याचा अनुभव सांगितला. व्हिडिओमध्ये सुनील लहरी म्हणाले की, 'रामायण मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं. काही काळासाठी मी फ्री झालो तर विचार केला रामलीला पाहायला जाऊ. रामलीला पाहण्यासाठी मी दिल्लीत गेलो. जेव्हा मी रामलीला मैदानात पोहोचलो तेव्हा चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यातही मी त्यांना भेटायला आलो हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते अधिकत उत्साहित झाले. त्यांनी माझा कुर्ताच फाडला.' फाटलेल्या कुर्त्यावर स्टेजवर जाणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. शेवटी रामलीलाच्या संयोजकांनी माझ्यासाठी नवीन कुर्ता मागवला. तेव्हा मला एक गोष्ट जाणवली की, कधीकधी चाहत्यांच्या फार जवळ जाणंही त्रासदायकच असतं. दरम्यान, करोना व्हायरसचा विळखा देशभरात घट्ट होत असताना सरकारकडून जनतेला घरी राहण्याची विनंती करण्यात आली. अनेक दिवसांपासून देशातील अनेक राज्य लॉकडाउन आहेत. या काळात लोकांच्या मनोरंजनासाठी डीडी नॅशनलने त्यांचे सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम आणि महाभारतचं पूर्नःप्रक्षेपण केलं. एवढ्या वर्षांनंतरही या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. विशेषतः तरुणाईकडून या मालिकांना अधिक चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक एपिसोडनंतर सोशल मीडियावर यावर भरभरून चर्चाही केली जाते.