IPLमध्ये मला 'कालू' म्हणायचे; खेळाडूचा धक्कादायक खुलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 7, 2020

IPLमध्ये मला 'कालू' म्हणायचे; खेळाडूचा धक्कादायक खुलासा

https://ift.tt/2UfCVw3
नवी दिल्ली: अमेरिकेतून सुरू झालेला वर्णद्वेषचे प्रकरण क्रिकेटच्या मैदानावर दाखल झाले आहे. बीसीसीआयकडून आयोजित होणाऱ्या स्पर्धेत वर्णद्वेष होत असल्याचा धक्कादायक खुलासा एका क्रिकेटपटूने केला आहे. अमेरिकेत जॉर्ज फ्लॉएडची पोलिसांनी हत्या केली असल्याचा आरोप करत वर्णद्वेषविरोधी आंदोलन चांगलेच पेटले असून त्याविरुद्ध क्रिकेटपटू देखील आवाज उठवत आहेत. वाचा- वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीने आयपीएल स्पर्धेत वर्णद्वेषाला सामोरे केल्याचे सांगितले. फक्त माझ्या सोबत नाही तर श्रीलंकेचा खेळाडू याच्या सोबत देखील असा प्रकार झाल्याचा खुलासा सॅमीने केला. आयपीएलमध्ये मला आणि परेराला 'कालू 'म्हणून हाक मारली जायची. जेव्हा मला या शब्दाचा अर्थ कळाला तेव्हा प्रचंड राग आल्याचे तो म्हणाला. काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील मिनियापॉलिस परिसरात आफ्रिकी वंशाचा अमेरिकी नागरीक जॉर्ज फ्लॉयड याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. त्यानंतर जगभरात वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवला जात आहे. यात क्रीडा क्षेत्रातील काही खेळाडूंचा समावेश आहे. वाचा- ख्रिस गेल, आणि आंद्र रसेल यासह काही खेळाडूंनी वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवला. इंटरनेटवर मोबाइल स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. हा स्क्रीनशॉट सॅमीच्या मोबाइलचा असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात पोस्टमध्ये हे सांगितले नाही की, आयपीएलमध्ये त्याला कोण 'कालू' म्हणून हाक मारायचे. मैदानावर सामना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक की प्रत्यक्षात खेळाडू असे म्हणायचे हे त्याने स्पष्ट केले नाही. मला आताच 'कालू' या शब्दाचा अर्थ कळाला. आयपीएलमध्ये सनरायझर्सकडून खेळायचे तेव्हा मला आणि परेरा यांना या नावाने हाक मारली जायची. मला पहिला वाटायचे की याचा अर्थ ताकदवान घोडा असेल. पण आता अर्थ कळाल्यानंतर खुप राग येतोय, असे स्क्रीनशॉटमधील पोस्टमधील मेसेज मध्ये लिहले आहे. दुसऱ्या एका स्क्रीनशॉटमध्ये तो म्हणतो, ओह तर याचा अर्थ असा आहे. मला आणि परेराला भारतात कालू म्हणतात.