पीयुष गोयल यांना मातृशोक; भाजप नेत्या चंद्रकांता गोयल कालवश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 6, 2020

पीयुष गोयल यांना मातृशोक; भाजप नेत्या चंद्रकांता गोयल कालवश

https://ift.tt/3eWx86O
मुंबई: केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या मातोश्री व भाजपच्या माजी आमदार यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबद्दल पीयुष गोयल यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. 'स्नेह आणि ममत्वाने मला नेहमीच वाट दाखवणाऱ्या माझ्या आईचे आज सकाळी निधन झाले आहे. आईने आयुष्यभर स्वत:ला सेवेसाठी वाहून घेतले आणि आम्हालाही त्यासाठी नेहमी प्रेरणा दिली', अशा भावना पीयुष गोयल यांनी व्यक्त केल्या. चंद्रकांता गोयल या भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक होत्या. भाजपमध्ये अत्यंत निष्ठेने त्यांनी काम केले. मुंबईतील माटुंगा विधानसभा मतदारसंघात त्यांचा मोठा प्रभाव होता. या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्या तीनवेळा निवडून आल्या होत्या. भाजपच्या जडणघडणीत त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. गोयल कुटुंब जनसंघाच्या काळापासूनच भाजपशी जोडलं गेलेलं आहे. चंद्रकांता गोयल यांचे पती हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. सरकारमध्ये त्यांनी शिपिंग मंत्रालयाची धुरा सांभाळली होती. चंद्रकांता गोयल यांच्या निधनाने भाजपने एक धडाडीचं महिला नेतृत्व व उत्तम संघटक गमावल्याची भावना ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी व्यक्त केली आहे. नेते विनोद तावडे, खासदार पूनम महाजन यांनीही चंद्रकांता गोयल यांना श्रद्धांजली वाहिली.