मुंबईकरांसाठी मोठी बातमी; रिक्षा-टॅक्सी भाडे आजपासून वाढणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 1, 2022

मुंबईकरांसाठी मोठी बातमी; रिक्षा-टॅक्सी भाडे आजपासून वाढणार

https://ift.tt/6kRE19u
म. टा. प्रतिनिधी, मुंबईः रिक्षा-टॅक्सीच्या किमान भाडेदरात आज, शनिवारपासून अनुक्रमे २ व ३ रुपयांची वाढ लागू होत आहे. यामुळे रिक्षाचे किमान भाडे २३ तर टॅक्सीचे २८ रुपये होणार आहे. सुधारित दरानुसार मीटर सुसंगत करण्याची प्रक्रिया (कॅलिब्रेशन) शनिवारपासून सुरू होणार असून दोन महिने हे काम सुरू राहील. नव्या वर्षात मीटरनुसार भाडे सुरू होईल. प्रवासी आणि चालक यांच्यातील वाद टाळण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने बारकोड असलेले दरपत्रक चालकांना दिले आहे. हा बारकोड स्कॅन करून प्रवाशांना दरपत्रकाची वैधता तपासता येईल, अशी माहिती परिवहन आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी दिली. मीटर कॅलिब्रेशनसाठी मुंबई महानगर प्रदेशातील रिक्षा-टॅक्सी चालकांना दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. आज, शनिवारपासून ही प्रक्रिया सुरू होईल. ती जलदगतीने व्हावी, यासाठी ११ कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या वर्षात मीटरनुसार भाडे आकारण्याच्या सूचना चालकांना देण्यात आलेल्या आहेत, यामुळे आगामी दोन महिने प्रवाशांना चालकांकडे असलेल्या दरपत्रकानुसारच पैसे द्यावे लागणार आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.